शेगांव – बाळापूर रस्त्याच्या दुतर्फा 6 हजार झाडांचेच वृक्षारोपण
बुलडाणा,दि.11 : शेगांव-बाळापूर रस्त्याच्या दुतर्फा कामाच्या करारानुसार कंत्राटदाराने 6 हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. असा खुलासा ‘रस्ता कामाच्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रूपयांची देयके घातली घशात’ या वृत्ताचे खंडन करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रविण पुंडकर, सा. बां उपविभाग, खामगाव यांनी दिला आहे.
खुलाशानुसार, या रस्ता कामाच्या करारानुसार कंत्राटदाराने 6 हजार झाडे लावणे अपेक्षीत होते. त्यानुसार पुर्ण 6 हजार झाडे कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली होती. अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक प्रादुर्भावामुळे काही झाडे जगली नाहीत. आज रोजी 5500 झाडे जिवंत आहेत व सुस्थितीत आहे. त्यांची देखभाल ही कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.
पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठ्यासाठी विशेष मोहीम
- किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देणार
- पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या बँकेशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यामध्ये आज रोजी जवळपास 3 लाख 60 हजार शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. लाभार्थी शेतकरी वेगवेगळ्या वित्तिय संस्था व बॅंकेकडून पीक कर्ज घेतात. लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जवळपास 3 लाख 1 हजार शेतक-यांनी पीक कर्ज – किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ अद्यापही जवळपास 59 हजार शेतकऱ्यांना वित्तिय संस्था व बॅंकाकडून पीक कर्ज – किसान क्रेडीट कार्ड घेतलेले नाही. त्या अनुषंगाने अशा शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज – किसान क्रेटी कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत केंद्र शासनाच्या वित्तिय विभागाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही अशाप्रकारची मोहिम राबविण्यात येणार आहे.
तसेच पात्र शेतकऱ्यांना सुटसुटीतरित्या अर्ज करण्याकरीता आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्जासोबत शेतीचा 7/12 उतारे, कागदपत्र व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बॅकेकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, त्या बँकेशी संपर्क साधावा. कोणत्याही बॅक अथवा वित्तिय संस्था मार्फत 3 लाख पर्यतच्या पीक कर्ज – किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करण्याकरीता बॅकेचे प्रोसेसिंग चार्जेस इत्यादी लावण्यात येणार नाहीत. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये बॅंकांमार्फत पीक कर्ज – किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पातळीवर विशेष मोहिमे दरम्यान आपल्या कार्यक्षेत्रातील बॅंकांना सहकार्य करावे. अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ज्या पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तिय संस्था अथवा बॅंकेकडून पीक कर्ज – किसान क्रेडीट कार्ड घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले आहे.
000000
शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू व तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
- 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा, दि 11 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील एपीएल केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदुळाची भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण गहू 2 रूपये किलो व प्रति लाभार्थी 4 किलो, तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो व प्रति लाभार्थी 1 किलो आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 1474 व तांदूळ 368 क्विंटल, बुलडाणा : गहू 975 व तांदूळ 244, दे.राजा गोदामाकरीता गहू 932 व तांदूळ 233, अमडापूर : गहू 320 व तांदूळ 80, मोताळासाठी गहू 776 व तांदूळ 194, नांदुरासाठी गहू 1256 व तांदूळ 314, खामगांव गोदामकरीता गहू 1177 व तांदूळ 293, शेगांवकरीता गहू 1088 व तांदूळ 272, जळगांव जामोदकरीता गहू 1051 व तांदूळ 263, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 784 व तांदूळ 196, मेहकरसाठी गहू 1202 व तांदूळ 301, लोणारकरीता गहू 1215 व तांदूळ 304 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता गहू 1108 व तांदूळ 277 क्विंटल, मलकापूर : गहू 935 व तांदूळ 234, साखरखेर्डा : गहू 493 व तांदूळ 123 आणि डोणगांवकरीता गहू 494 व तांदूळ 124 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 15280 व तांदूळ 3 हजार 820 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
- 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि 11 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील अंत्योदय योजने करीता गहू व तांदूळाची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो आहे. तर परिमाण प्रति लाभार्थी 15 किलो गहू व तांदुळ 20 किलो आहेत.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 469 क्विंटल, बुलडाणा : गहू 1018 क्विंटल, दे.राजा गोदामाकरीता गहू 400, अमडापूर : गहू 159 क्विंटल, मोताळासाठी गहू 835 क्विंटल, नांदुरासाठी गहू 898 क्विंटल, खामगांव गोदामकरीता गहू 711, शेगांवकरीता गहू 448, जळगांव जामोदकरीता गहू 753, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 896, मेहकरसाठी गहू 618 , लोणारकरीता गहू 982, सिंदखेड राजाकरीता गहू 405 क्विंटल, मलकापूर : गहू 670, साखरखेर्डा गहू 224, आणि डोणगांव करीता गहू 194 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 9680 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment