राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र लॉन टेनिस संघाला रौप्य पदक

 

राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र लॉन टेनिस संघाला रौप्य पदक

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 22: स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अतंर्गत झारखंड शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने रांची (झारखंड) येथे दि.16 ते 19 जानेवारी दरम्यान 68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने रौप्य पदकावर आपले नाव कोरीत महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाचे नाव लोकीक केले.

 

सांघिक प्रकारामध्ये संप्रित शर्मा, नीव कोठारी, लक्ष गुजराथी, अभिराम  निखले, ओमकार शिंदे या सर्व खेळाडुंनी रौप्यपदक प्राप्त केले. महाराष्ट्राने झारखंड, पंजाब, सीबीएसई व चंदीगड संघावर विजय मिळवत रौप्य पदकाची कमाई केली.  वैयक्तीक प्रकारात ओमकार शिंदेला रौप्यपदक व लक्ष गुलराथी याला कास्य पदक आपल्या नावे केले. मुलींच्या संघाने चौथ्या क्रमांक प्राप्त करत आपली वाटचाल कायम ठेवली. या यशाकरीता सर्व खेळाडुंचे तसेच संघ व्यवस्थापक डॉ. जीवन मोहोड, संघ मार्गदर्शक ओमकार साठे व राधिका महाजन यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर  तसेच क्रीडा अधिकारी आर.आर.धारपवार, संदीप केळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे  व इतर सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या