ध्वनिक्षेपक
व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित
बुलडाणा,(जिमाका)
दि.10: ध्वनी प्रदुषण
नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी श्रोतृगृहे,
सामुहिक सभागृहे व मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या
निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात
येणारे दिवस जाहीर करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहीत
मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुढील वर्षात सुट देण्यात येणारे
13 दिवस जाहीर करण्यात आले आहे. तर उर्वरित 2 दिवस राखीव ठेवण्यात येवून महत्वाच्या
वेळी व गरज भासल्यास त्या त्या वेळी निश्चित करण्यात येणार आहे. ध्वनी मर्यादेचे व
तरतूदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने
वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी
डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.
> निश्चित केलेले दिवस : राजमाता जिजाऊ जयंती, शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, गणपती उत्सवातील दुसरा, पाचवा,
गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी असे चार दिवस, नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमीचा दिवस,
लक्ष्मीपूजन व 31 डिसेंबर 2025.
000000
Comments
Post a Comment