संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट
संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर
दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट
बुलडाणा,(जिमाका)
दि.13: येथील संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात
काही दिवसापूर्वी घडलेल्या अनुचित प्रकाराची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली
असून त्याअनुषंगाने आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे सोमवारी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
आले होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली.
भेटीदरम्यान वसतिगृह व शाळेची पाहणी करुन तेथील सुधारणाविषयी
सूचना केल्या. यामध्ये वसतिगृहातील दस्तावेजाचे अद्यावतीकरण, पिण्याचे पाणी, शौचालयातील
सुविधा, बेडची व्यवस्था, टिनशेड आदी पायाभुत सुविधा तातडीने पुरविण्याचे निर्देश उपाध्यक्ष
धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना
दिल्याचे त्यांनी सांगितले.
बुलढाणा नगरपालिकेतील विविध विषयांचा
घेतला आढावा
दरम्यान बुलढाणा नगरपरिषदेतील कामकाजाचा आढावा घेताना आयोगाचे
उपाध्यक्ष श्री. मेश्राम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेचा आढावा घेतला.
या योजनेतून दोन वाचलनालयामध्ये एका आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचे पुस्तके खरेदी
केल्याचे निर्देशनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची समाजकल्याण अमरावती
विभागाचे उपायुक्त यांनी स्व:त चौकशी करुन तपशिलवार अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे
सूचना दिल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मेश्राम यांनी दिली.
नगरपालिकांतर्गत अनुसूचित जातीच्या वर्गासाठी असलेल्या
निधीचा विनियोगाचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले. तसेच स्मशानभुमीच्या कामातील अनियमिततेची
चौकशी सहायक आयुक्त समाजकल्याण व बुलढाणा नगरपालिका मुख्यधिकारी यांनी तातडीने करुन
अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
00000
Comments
Post a Comment