सोमवारी महिला लोकशाही दिन

 

सोमवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 :दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. जानेवारी  महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार , दि. 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे. 00000

Comments