जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

 

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा करीता माजी सैनिक/इतर प्रवर्गातुन तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मुलांचे वसतिगृह चौकीदार (अशासकिय)-एक पद भरावयाचे आहे.

या पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या व इतर नागरीकाकडून 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. वैयक्तिक अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पास बुक व 10 वी पास प्रमाणपत्र (छायांकित प्रत)/ अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक, ओळखपत्र जोडावे. 00000

Comments