शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा

 








शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : शासकिय सेवेत, शिक्षण कार्यात शिक्षकांचे कर्तव्य करताना त्याला  उद्योग धंदा म्हणून जीवनात स्थान देऊ नका. त्यागी वृत्तीने ज्ञानदान देऊन विद्यार्थी घडवा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.

 

बुलढाणा जिल्हा परिषद व शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील संबंधीत घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शैक्षणिक गुणवत्ता संमेलनाचे आयोजन दि. 17 जानेवारी रोजी सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड, शिक्षणधिकारी (प्राथमिक) जे.ओ.भटकर, अधिव्याख्याता समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, अनिल देवकर व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

 

 कार्यकमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत समाधान डुकरे यांनी अभ्यास शैलीनुसार पुस्तक निर्मीत अंतर्गत प्रेरणादायी शाळा सृजन लेखमाला, शिक्षणानंद आणि समावित शिक्षणातून दिव्यांगांचा विकास व्हावा या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्राअंतर्गत जिल्हास्तरीय नवउपक्रम स्पर्धा 2024-25 मध्ये शिक्षकांना प्राथमिक शिक्षक गटातुन डॉ. फकिरा राजगुरु, विजय मोंढे, नागसेन साबळे, स्मिता कोल्हे, उर्मिला शेळके व उत्तेजनार्थ शेख मतिन शेख नजिर, अंजली क्षिरसागर व माध्यमिक गटातुन शदर देशपांडे, डॉ.फिरोज खान इब्राहिम खान, जनार्धन मेहेत्रे, प्रविण क्षिरसागर, सुवर्णा नंदकिशोर कुळकर्णी, उत्तेजनार्थ संजयसिंह तोमर यांना पारितोषीक वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद व ओपन लिंक फाऊंडेशन यांच्यातील सामजस्य करार अंतर्गत आचार्य विनोबा भावे सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा ॲपच्या माध्यमातुन जिल्ह्यातील उपक्रमाशिल शिक्षकांना प्रत्येक महिण्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सुगम पाठशाळा अंतर्गत जिल्ह्यांतील 14 शाळेतील संगित शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापान समितीचे अध्यक्ष व गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हार्मोनियम आणि तबला या संगित साहित्याचे वितरण करण्यात आले.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाळासाहेब खरात यांनी तर सुत्रसंचालन अरविंद शिंगाडे व आभार प्रदर्शन अंजली नेटके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

0000000

Comments