जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा; कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे - डॉ. किरण पाटील

 





जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा; कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे - डॉ. किरण पाटील

बुलडाणा, (जिमाका) दि. 23: आपात्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधा तातडीणे पोहचणे गरजेचे असतात. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने नेहमी कार्यतत्पर राहून चांगली आरोग्य सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ.कै. उ. झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी तसेच सहायक संचालक आरोग्य सेवा, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे लाईन तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी अपघात किंवा आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अशावेळी आरोग्य सुविधा तातडीने पोहोचणे आवश्यक असतात. यासाठी आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर असावे. अपघात किंवा आपात परिस्थिती निर्माण होण्याऱ्या ठिकाणी रुग्णवाहिका, रुणालयातील बेड, ऑक्सीजन, औषधी, रक्त उपलब्धता आदी मुलभुत आरोग्य सोयीसुविधा सज्ज ठेवावे. आरोग्य विभागाने नेहमी अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणच्या कार्यशाळा नियमितपणे घ्याव्यात. यासाठी प्रत्येक भागात एक किंवा दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात समितीचे गठण करावे. दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर इतरांना मार्गदर्शन करतील, याचे नियोजन करावे.

आरोग्य संस्थेमध्ये बाळंतपण झालेल्या महिलांना 102 क्रमांकाच्या गाडीतून घरपोच पोहचविण्याचे प्रमाण वाढवा. हे उद्दिष्ट 100 टक्केच असले पाहिजे. जिल्ह्यात मातामृत्यु-बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी यांनी उपाययोजना राबवावी. तसेच आशावर्कर व अंगणवाडी सेविकामार्फत नवजात बालकांच्या आरोग्याची नियमित माहिती घेऊन लसीकरण होत असल्याची खात्री करावी. तालुका व ग्रामस्तरावर कुष्ठरोग जनजागृती करण्यासाठी दि. 30 जानेवारी ते 13 फेबुवारी 2025 या पंधरवाड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबवावे, असेही निर्देश डॉ. पाटील यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहीम, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, मातामृत्यु प्रमाण, बालमृत्यु प्रमाण, जन्मदर-मृत्युदर, जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी, जननी शिशु सुरक्षा योजना, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मोबाईल मेडीकल युनीट, 108 रुग्णवाहिका आदी विषयांचा आढावा घेतला.

00000000

 


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या