जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन; > वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा
जिल्हा
ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन;
>
वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा
बुलढाणा, दि.
2(जिमाका) : जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत
भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनात
अमूल्य वाचनीय ग्रंथांची मेजवानी वाचकांसाठी उपलब्ध असून या ग्रंथ प्रदर्शनाचा जास्तीत
जास्त वाचनप्रेमी, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाला
प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, अप्पर कोषागार अधिकारी बबन इटे, जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुनील पाटील, मॉडेल डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळसने, जिल्हा
ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. की.वा. वाघ, माहिती सहायक सतीश बगमारे, जिल्हा कोषागार
कार्यालयाचे सहायक लेखाधिकारी श्याम जाधव तसेच मोठ्या प्रमाणात वाचक, स्पर्धा परीक्षा
विद्यार्थी, शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अलिकडच्या काळात
देशाची तरूण पिढी वाचन संस्कृतीपासुन दुरावत असल्याचे दिसत आहे. या पिढीला प्रत्यक्ष
ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प
महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय येथे ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद,
पुस्तक परीक्षण व कथन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही वाचन पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे सुमारे 1 लक्ष 60 हजार ग्रंथसंपदा उपलब्ध असून त्यामध्ये
मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील विविधांगी कथासंग्रह, कादंबरी, संदर्भग्रंथ, ललित वाड:मय,
स्पर्धा परीक्षा ग्रंथ इत्यादी ग्रंथसंपदा उपलब्ध असून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या
उपक्रमामध्ये जास्तीतजास्त वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुनील पाटील यांनी केले आहे. 000000
Comments
Post a Comment