दिव्यांगांसाठी फिरत्या वाहनावरील दुकान; 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

 

दिव्यांगांसाठी फिरत्या वाहनावरील दुकान; 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

 

        बुलढाणा,दि.28 (जिमाका) : महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व गरजू दिव्यांगांनी दि. 6 फेबुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 

            दिव्यांग स्वावलंबी होण्यादृष्टीने दि. 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादित यांच्या स्तरावरुन होणार आहे.

 

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार किंवा कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश आहे.

 

            अर्ज नोंदणी करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आले असून इच्छूक व गरजू दिव्यांगांनी https://register.mshfdc.co.in या लिंक वर ऑनलाईन अर्ज दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सदर योजनेचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या