शेगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 108 सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न

 

शेगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 108 सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न

 

 

बुलडाणा,(जिमाका) दि.13: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि.12 जानेवारी रोजी मथुरा लॉन्स शेगाव येथे 108 सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वयंसेवी संस्था, नागरिक व विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.   

 

  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच कस्तुराई बहुउद्देशीय संस्था, पतंजली परिवार शेगाव जायंट्स ग्रुप शेगाव यांच्या संयुक्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.  भारत स्वाभिमान प्रांत सह कोषाध्यक्ष पी. आर. सुलताने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व सांगितले. कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष व योग शिक्षीका कालिंदी असंबे यांनी बालयोग साधक, युवा योग साधक, साधिका व विद्यार्थ्यांकडून 108 सूर्यनमस्कार करून घेतले.

 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील, पतंजली जिल्हा प्रभारी चतुर्भजी मिटकरी, महिला पतंजली जिल्हाध्यक्ष श्रीमती चांडक, पतंजली कृषी सह कोषाध्यक्ष निळकंजी साबळे, जायंट्स फेडरेशन अध्यक्ष व मथुरा लॉन्सचे संचालक विनायक भारंबे, जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर उपस्थित होते.

 

 नवोदय विद्यालय, चिन्मय विद्यालय स्वामी विवेकानंद शाळा, गो ग्रीन संस्थेचे सदस्य, लावण्या योगा क्लासेसच्या सर्व योगसाधिका, विद्यार्थ्यांचे पालक वर्ग व शेगाव मधील इतर योगप्रेमींनी मोठ्या प्रमाणात   108 सूर्यनमस्कार मध्ये सहभाग घेतला. लावण्या योगा क्लासेसच्या वैष्णवी उमाळे, हर्षदा बैतुले, स्वाती गोल्हर, मेधा कुलकर्णी, प्रणिता कऱ्हे, ज्योती धुमाडे, विना लाखे, रूपाली राहटे, योगिता शेंडे, संगीता खेडकर, विद्या नारखेडे, टाले मॅडम या महिलांनी सुद्धा 108 सूर्य नमस्कार घालून शारीरिकरित्या तंदुरुस्त असल्याची प्रेरणा दिली.  सूर्यनमस्कार काढलेल्या सर्व योग साधकांना प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी,बी.एस. महानकर व ठाणेदार नितीनजी पाटील यांच्या हस्ते देऊन योग साधकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रो ग्रीन फाउंडेशन सदस्य विठ्ठल जी मिरगे यांनी तर आभार प्रदर्शन विनाय भारंबे यांनी केले. कार्यक्रमाकरिता पतंजली परिवार शेगाव जायंट्स ग्रुप व कस्तुराई बहुउद्देशीय संस्था शेगाव व क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

00000

Comments