सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले
बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा येथे माजी
सैनिक, इतर प्रवर्गातुन तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मुलांचे
वसतिगृहात चौकिदाराचे (अशासकिय) एक पद भरावयाचे आहे. सदर पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील
सेवानिवृत्त असलेले व इतर नागरीकाकडून दि. 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात
येत आहेत. वैयक्तिक अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक व दहावी
पास प्रमाणपत्र, अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक ओळखपत्र जोडावे,
अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविली आहे.
00000
Comments
Post a Comment