उमाळा
येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २५ वी सभा व रब्बी पीक नियोजन शेतकरी मेळावा संपन्न
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : आज दिनांक १५ जानेवारी, २०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र,
बुलढाणा अंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची २५ वी सभा तालुक्यातील उमाळा येथे संपन्न
झाली. तसेच रब्बी पीक नियोजन शेतकरी मेळावाही घेण्यात आला.
या सभेस प्रमुख उपस्थिती सरपंच (उमाळा) पंडितराव सपकाळ,, बुलढाणा कृषी विज्ञान
केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख
शास्त्रज्ज्ञ डॉ. दिनेश कानवडे, हवामान शास्त्रज्ज्ञ डॉ. जगदीश वाडकर, कृषी विज्ञान
केंद्राचे पशुसंवर्धन विषयतज्ज्ञ मनेश यदुलवार, डॉ. नरेंद्र देशमुख, मंडळ कृषि अधिकारी
पी.एम. देशमुख, कृषी सहाय्यक व्ही. के जाधव,
कृषी पर्यवेक्षक आर. टी. म्हस्के, तसेच कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, शेतकरी-शास्त्रज्ञ
मंचचे सचिव विजयजी भुतेकर, कृषि संशोधन केंद्र, बुलढाणा- शेतकरी-शास्त्रज्ञमंचाचे सदस्य
आणि उमाळा पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय तज्ञ कृषि विस्तार शिक्षण
डॉ. जगदीश वाडकर यांनी केले. शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना, त्यामागची कुलगुरू
डॉ. शरदजी गडाख, डॉ.पंदेकृवी, अकोला यांची संकल्पना व सद्यस्थितीत मंचाची ही २५ वी
सभा असून याद्वारे प्रत्येक सदस्यांचे शेतीतील अनुभव व शास्त्राज्ञान्द्वारे मिळणारे
तंत्रज्ञान याचे महत्व विषद करून मंचातील सदस्यांमार्फत
जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रवास जलद व अविरत होत असल्याबाबत माहिती
दिली.
यावेळी डॉ. अमोल झापे यांनी हरभरा पिकातील बुरशीजन्य रोगाचे
व्यवस्थापन व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केले.हरभरा पिकांमध्ये बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान व उत्पादनावर पडणारा फरक याबाबत
सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी या रोगांचे व्यवस्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती
दिली. शेतकऱ्यांसोबत विविध विषयावर हितगुज करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना
सांगितल्या.
डॉ. दिनेश कानवडे यांनी तृणधान्य व भरडधान्याचे आहारातील
महत्त्व व लागवड पद्धती तंत्रज्ञान बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. तृणधान्य व भरडधान्याचे
आहारात समावेश करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी तृणधान्यांमध्ये
असलेल्या अन्नघटकांची सविस्तर माहिती देऊन हे अन्नघटक शरीराला कसे पोषक ठरतात बाबत
माहिती दिली. सध्या आपली आहार पद्धती व वाढत्या शारीरिक समस्याबाबत शेतकऱ्यांना अवगत
करून तृणधान्य व भरडधान्याचे महत्त्व पटवून दिले.
अवचितराव पालकर यांनी गावकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या
पशुधनासाठी मुरघासाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो बाबत माहिती दिली. मुरघास कसा
तयार करावा, त्याचा वापर केल्यानंतर जनावरांनी मध्ये काय फरक दिसतात व जनावरांसाठी
तो कसा उपयुक्त आहे बाबत सविस्तर माहिती दिली. मुरघास तयार करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री,
पद्धती तसेच चारा पिकांची लागवड करून मुरघास तयार करावा जेणेकरून चाऱ्याच्या कमतरतेच्या
दिवसांमध्ये व जनावरांना पोषक असा मुरघास तयार करून वापरावा, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने पी.
एम. देशमुखयांनी कृषि विभागामार्फत असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घ्यावा त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता
करणे आवश्यक आहे व योजनांचा लाभ कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जातो बाबत सविस्तर माहिती
दिली.
सर्व तज्ञांचे मार्गदर्शन झाल्यानंतर शेतकरी-शास्त्रज्ञ
मंचाचे सदस्य हरिभाऊ येवले, गणेश किसन तायडे, अवचितराव पालकर आणि आयोजक म्हणून प्रकाश
सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर दुर्गादास सपकाळ यांच्या म्हैस पालन दुग्ध्व्यवसायास
सर्वांनी भेट देऊन व्यवस्थापनाबाबत चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळ तर प्रकाश सपकाळ
यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाशराव सपकाळ आणि ग्रामस्थांनी,
तसेच कृषी विज्ञान केंद्रयेथील शास्त्रज्ञांनी प्रयत्न घेतले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000000
Comments
Post a Comment