68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

 




68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

        बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : झारखंड (रांची) येथे दिनांक 17 जानेवारी ते 19 जानेवारी, 2025पर्यंत होऊ घातलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धे करिता मुली व मुले महाराष्ट्र संघ दिनांक 15 जानेवारी, 2025 रोजी अकोला येथून रवाना झाला. संघामध्ये महाराष्ट्र मधील पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, विभागातील खेळाडूंचा समावेश आहे. संघ रवाना होण्यापूर्वी मलकापूर येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघा व्यवस्थापाक म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड, संघ मार्गदर्शक ओंकार साठे व राधिका या रवाना झाले. संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी .बी.एस. महानकर, राज्य क्रिडा मार्गदर्शक लाडगे, क्रीडा अधिकारी धारपवार, संदीप केळे यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. 00000000



Comments