इ १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

 

इ १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत क्रीडा आयुक्त सुचित केले आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

 

दरवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे परिपुर्ण प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास पाठविले जातात.

 

सन २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी, या वर्षीपासून म्हणजेच २०२४-२५ यावर्षापासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

 

त्याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांचेकडून स्विकारल्या जाणार नाही याची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.  0000000

 

Comments