वृत्त क्रमांक : 14, दिनांक : 04.01.2025
बुलढाणा, दि. ४ (जिमाका) : केंद्र आणि राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यामधील एकूण १३ तालुक्यातील कार्यरत ५०४ महसूल अधिकारी व ८९ मंडळ अधिकारी असे एकूण ५९३ लॅपटॉप व ५९३ प्रिंटरचे वाटप जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात हा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत डिजिटल इंडिया लॅंड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालय यांचे मान्यतेने या साहित्याचे वाटप करण्यात आले.
000
Comments
Post a Comment