जिल्हास्तरीय
शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
बुलडाणा, (जिमाका) दि. 1: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल
संघटना बुलढाणाद्वारे 13 वर्ष वयोगटातील शालेय प्रतिभावंत खेळाडुंचा शोध घेण्यासाठी
जिल्हास्तरीय फुटबॉल (मुले) सन 2025-26 शालेय लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 10 जानेवरीपर्यंत अर्ज सादर
करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळेतील 13 वर्ष वयोगटातील खेळाडुंना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता
जिल्ह्यातील विविध शाळेतील संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन
विनामूल्य नोंदणी करून संघाची यादी
दि.10 जानेवारीपर्यंत कार्यालयात जमा करून
प्रवेश निश्चित करावा. सदर स्पर्धेसाठी खेळाडुंची वयोमर्यादा 1 जानेवारी 2012 नंतरचा
जन्म झालेला खेळाडु सदर स्पर्धेकरीता पात्र राहील. स्पर्धेची तारीख आपणास नंतर कळविण्यात
येईल.
सदर स्पर्धेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत
जास्त संघानी सहभाग नोंदवुन स्पर्धा यशस्वी
करण्यास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी एन.आर. वानखेडे 9960434487, एस.एस.केळे
9423446516 व डॉ. जे. डब्ल्यु मोहोड 9405734403 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
00000000
Comments
Post a Comment