राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’; महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन
राष्ट्रमाता
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’;
महोत्सवाचा लाभ
घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत
जिल्हाधिकारी कार्यालय, व नगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने राष्ट्रमाता जिजाऊ
जन्मोत्सवनिमित्त जिजाऊ गाथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव श्री.
लखुजीराजे जाधव राजवाडा(राजमाता जिजाऊ जन्मस्थळ) परिसर, सिंदखेड राजा येथे दि.10 व
11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपासून सुरु होणार असून विविध सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री
सोनाली कुलकर्णी व 100 कलाकारांचा समूहाव्दारे ‘जिजाऊ वंदना महाराष्ट्राची
लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम. दि. 11 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक
नंदेश उमप यांचा कार्यक्रम होणार आहे.
000000
Comments
Post a Comment