शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित
बुलडाणा,(जिमाका)
दि.11: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा
विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन
अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिंकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा
मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (माहिला
क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार
प्रदान करण्यात येतात. शासन निर्णय दि.29 डिसेंबर 2023 व दि. 25 जानेवारी 2024 नुसार
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली-2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार
सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू साहसी उपक्रम व
दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर
अर्ज करावा. ही लिंक दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी
2025 या कालावधीपर्यंत सुरु राहिल. तसेच अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे
कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment