ई-पिक पाहणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 


ई-पिक पाहणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

            बुलढाणा,(जिमाका) दि. 23 :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरुवात दि. 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सातबारावर पिकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत होता. सहायक स्तरावरील  ई-पिक पाहणी नोंदणी दि. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी डिसीएस सहायकांकडून पीकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली आहे.

रब्बी हंगामी 2024 ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजरोजी पर्यंत 7 लाख 56 हजार 539 हे. आर. क्षेत्रापैकी 2 लाख 53 हजार 551 हे. आर क्षेत्रावर, तसेच एकूण 8 लक्ष 36 हजार 037 पिक पाहणी करावयाच्या खातेदारापैकी 2 लक्ष 46 हजार 679 प्लॉटवर सबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची ई-पीक पाहणी डिसीएस व्हर्जन 3.0 या मोबाईल ॲपद्वारे सातबारावर नोंदणी केलेली आहे. आजवर बुलढाणा जिल्ह्यात डिजीटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 33.51 टक्के  क्षेत्रावर झोलेली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधावांना ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ई पीक पाहणी द्वारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या सातबारा वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी सातबारा वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे.

00000000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या