मराठी भाषा संवर्धन
पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : मराठी भाषेचा
प्रचार व प्रसार व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरीता मराठी भाषा विभागाच्या
धोरणानुसार दरवर्षी दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
साजरा करण्यात येतो. पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दि. 27 जानेवारी
2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनीसोबतच
स्थानिक पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांचेकडून बुक स्टॉल लावण्यात येणार असून त्यामुळे
वाचकांना आपल्या आवडत्या ग्रंथांची खरेदी करता येणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनीला जिल्ह्यातील
सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रंथप्रेमी
व वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल पाटील यांनी केले
आहे.
0000000
Comments
Post a Comment