खरीप
व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;
शेतमाल
तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
बुलडाणा,
(जिमाका) दि. 10 : शासनाने सन
2024-25 मधील खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला
हमीभाव निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला उत्पादीत केलेला माल नजीकच्या कृषी
उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करावा. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना सुरु
केली असून पिकांना योग्य भाव मिळेपर्यंत उत्पादीत माल गोदामात ठेवण्याची सुविधा उपलब्ध
करुन दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणास मदत होणार असून या योजनाचा लाभ
शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण
यांनी केले आहे.
गहू 2 हजार 275 रुपये, ज्वारी(हायब्रीड-मालदांडी) 3 हजार 371-3 हजार 421 रुपये
, सोयाबीन 4 हजार 892 रुपये, मका 2 हजार 275 रुपये, तुर 7 हजार 550 रुपये, मुग 8 हजार
682 रुपये, उडीद 7 हजार 400 रुपये, चना 5 हजार 440 रुपये शासनाने हमीभाव निश्चित केला
आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाने घोषित केलेल्या हमीभाव व बाजारभावाप्रमाणे नजीकच्या
कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करावा. कृषि उत्पन्न बाजार समितीबाहेर खाजगी
व्यापाऱ्यांना विक्री केल्यास फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल काढणी हंगामात
त्यांच्या आर्थीक निकडीमुळे त्वरीत विक्रीसाठी बाजार आणतात. त्यामुळे विक्रीसाठी एकाचवेळी
बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते व परिणामी बाजारभाव कमी होवुन शेतकऱ्यांचे
आर्थीक नुकसान होते. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा शेतमालाची काही काळासाठी साठवणूक
करुन बाजारभाव चांगले असतांना साठवणुकीतील शेतमाल टप्याटप्याने विक्री केल्यास त्यांना
फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना असणारी आर्थीक निकड पूर्ण होऊन त्यांच्या शेतीमालासाठी
रास्त भाव मिळावा या दृष्टिकोनातुन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांचे मार्फत
शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या
अथवा वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाच्या पावतीवर शेतमालाच्या बाजारभावानुसार
रकमेच्या 75 टक्के पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना 180 दिवसांच्या मुदतीकरीता द.सा.द.शे.6
टक्के व्याजाने तारण कर्ज बाजार समितीकडुन त्वरीत देण्यात येते. शेतमाल तारण कर्ज योजनेत
तुर, मुग, उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी, गहु, हळद, भात (धान), करडई, बाजरी, राजमा, बेदाणा,
काजु बी व सुपारी या पिकांचा समावेश आहे. सदर
योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. 000000
Comments
Post a Comment