यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

               बुलडाणा, (जिमाका) दि. १३ : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजनेतंर्गत निवडअंती सन २०२४ चे राज्य वाड्:मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

                      या पुरस्कारासाठी दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासह दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

पुरस्कार नियमावलीनुसार पात्र लेखक, प्रकाशक यांना या योजनेत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती विहित नमुन्यातील अर्जासह स्थानिक निधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावे, असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या