जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकिय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित

 

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकिय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित

 बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकिय सदस्यांचा कार्यकाळ संपलेला असल्याने नविन समितीची पुर्नगठीत करण्यासाठी अशासकिय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पात्र इच्छुकांनी दि. 16 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.अमितकुमार दुबे यांनी केले आहे.

 अशासकीय सदस्यांची निवड जिल्हाधिकारी यांचे मार्फत करण्यात येणार असून सोसायटीमध्ये खालीलप्रमाणे अशासकिय सदस्य असणार आहेत. संबंधित जिल्ह्यातील गोशाळा किंवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष,  प्राणी कल्याण विषयक कार्य करीत असलेल्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य,  सर्वसाधारण समितीने नामनिर्देशीत केलेल्या दोन व्यक्ती, संबंधित जिल्ह्यातील मानव हितकारक कार्य करणारे किंवा प्राण्यांवर प्रेम करणारे प्राणी कल्याणसाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते यांची जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीसाठी अशासकिय सदस्यांची निवड करावयाची आहे.

नविन सदस्यांच्या निवडीसाठी जिल्यातील इच्छुकांनी आपला अर्ज वैयक्तीक माहीती व बायोडाटा आधार क्रमांक(आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, आयडी कार्ड, पॅन कार्ड यापैकी एक), रहिवाशी प्रमाणपत्र (ईलेक्ट्रीक बिल, आधार कार्ड, टेलिफोन बिल, पासपोर्ट यापैकी एक) जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे चारीत्र पडताळणी प्रमाणपत्र व आवश्यक कागद पत्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांच्याकडे सादर करण्यात यावे.

000000000

Comments