जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

 

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

बुलढाणा, दि. 7(जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील आरबिएसके संदर्भीत हद्यरोग असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांची 2 डि-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 08 वाजेपासुन  सुरु होईल. या तपासणी शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे. 00000

Comments