बुलढाण्यात आज निर्यातदारांसाठी कार्यशाळा

 




बुलढाण्यात आज निर्यातदारांसाठी कार्यशाळा

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आज बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे निर्यातदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील निर्यातदारांनी कार्यशाळेला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे.

निर्यात क्षेत्रात जागरूकता, उद्योजकता आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पुढाकाराने उद्योग विकास आणि निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत अमरावती क्षेत्राचे उद्योग सह संचालक निलेश निकम हे महाराष्ट्रातील निर्यात उपक्रमांविषयी माहिती देतील.   जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमईएस) उद्योग वाढीची संभाव्यता आणि पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करतील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी माहिती देणार आहेत. सहायक संचालक स्नेहल ढोके ह्या केंद्र सरकारच्या निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती देतील.

कार्यशाळेच्या मध्यातरानंतर सल्लागार अंकीत गुप्ता हे बुलढाणा निर्यात कृती आराखड्याविषयी माहिती देतील. डाक निर्यात केंद्राविषयी अधीक्षक जी.एन. जाधव माहिती देतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे कृषी विभागाच्या निर्यात प्रोत्साहन योजनेविषयी माहिती देतील. कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात प्रश्नोत्तर घेतल्यानंतर समारोप करण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी निर्यातदार, उद्योजकांनी https://forms.gle/PQr1QYgwZwwL5mTy7 या गुगल फॅार्मवर माहिती भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे. ०००

Comments