जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सपंन्न
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : मराठवाडा
ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधिक्षक कार्यालय बुलढाणा व जिल्हा
तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभा हॉल
पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची एकदिवसीय कार्यशाळा
संपन्न झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत
भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक मराठवाडा ग्रामीण
विकास संस्थेचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले, डॉ. निकिता गायकवाड व राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यकम जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील अर्चना आराख, मानसोपचार तज्ञ डॉ.कुणाल
शेवाळे उपस्थित होते.
अप्पासाहेब उगले यांनी कलम 4 (कोटपा) कलम 6 अ 6 ब त्याचप्रमाणे कलम
5,7,8,9 बाबत मार्गदर्शन केले. डॉ. निकिता गायकवाड यांनी मौखिक आरोग्यबाबत मार्गदर्शन
केले. अर्चना आराख यांनी तालुकास्तरीय समन्वय समितीची भुमिका, रुग्णालयातील सोयीसुविधा
व जबाबदारी याविषयी माहिती दिली. डॉ. कुणाल शेवाळे यांनी मानसिक आजार, व्यसन व उपचार
यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेकरिता
पोलिस निरिक्षक/उपनिरिक्षक तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेकरिता
पोलिस निरिक्षक/उपनिरिक्षक तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन
अनिल गुजे यांनी केले व आभार अर्चना आराख यांनी मानले. या कार्यशाळेकरिता मराठवाडा
ग्रामिण विकास संस्थेचे अनिल गुजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लगार
/ समुपदेशक श्री लक्ष्मण सरकटे यांनी परिश्रम घेतले.0000
Comments
Post a Comment