उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन
प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका)
दि.13: महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणामार्फत शेळी, कुक्कट, गाय व
म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन दि. 21 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले
आहे. उद्योग, व्यवसाय करू इच्छिणारा
सुशिक्षित बेरोजागार युवक-युवतीनी दि. 21 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी, असे
आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्राचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.
प्रशिक्षणामध्ये
शेळी, कुकुट, गाय व म्हैस पालनाचे तंत्र, प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन
रोग, लक्षणे, खाद्य निर्मिती, चाऱ्यांचे प्रकार, शासकीय योजना व उद्योग सुरु
करण्यासंदर्भातील माहिती पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या
प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगारांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन स्व:ताचा
व्यवसाय सुरु करावा हा आहे.
प्रशिक्षणात प्रवेश घेणारा उमेदवार हा किमान पाचवी पास,
वयोगट 18 ते 50 वर्षे असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र
दिल्या जाईल. प्रशिक्षणाची नोंदणी दि. 21 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु
आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तहसिल कार्यालयजवळ, चिखली
रोड, बुलडाणा येथे किंवा मो. नं. 9011578854, 8275093201 वर संपर्क साधावा, असे
आवाहन प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment