बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन
बुलढाणा
तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक
निबंधकाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 15 :
बुलढाणा तालुक्यातील 103 सहकारी संस्थाची
नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सहायक निबंधक सहकारी संस्थाव्दारे करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 89(4) नुसार अवसायनातील संस्थाशी ज्या
कोण्या व्यक्ती वा संस्थेविरुद्ध काही दावे असल्यास त्यांनी जाहिर सूचना प्रसिद्ध झाल्यचे
तारखेपासून दोन महिन्याचे आत नोंदवावे लागणार आहे. त्यानंतर दाव्यांची दखल घेतली जाणार
नाही, असे सहकारी संस्थाचे सहायक निबंधक गजानन आमले यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 नुसार
सहकारी संस्था अंतिम अवसायनात घेण्यात अलेल्या अहेत. या संस्थावर अवसायकाची नियुक्ती
यापुर्वीच करण्यात आलेली आहे. यापुढील दाखल केलेल्या दाव्याचे अनुषंगाने कोणत्याही
दावा दाखल न झाल्यास त्यांनतर 103 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल, यांची नोंद
घ्यावी.
00000
Comments
Post a Comment