राज्य क्रीडा
दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; खेळांडूचे होणार गौरव
बुलढाणा, दि. 14(जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय
पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणाद्वारे बुधवार दि.15 जानेवारी
रोजी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे दुपारी 4 वाजता ऑलिंपिक वीर दिवंगत खाशाबा
जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार होणार असून विविध कार्यक्रम घेतले
जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे.
दिवंगत खाशाबा जाधव ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी
येथे 1952 मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्ती मध्ये पहिले कास्य पदक पटकावून
देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासीक कामगिरी केली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय
स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान असून नवोदित खेळाडुंना प्रोत्साहन व प्रेरणा
देण्याकरीता राज्यभरात त्यांचा जन्मदिवस 15 जानेवारी क्रीडा दिन म्हणुन साजरा केला
जातो.
या दिवसानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक
शाळा, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, एकविध क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, क्रीडा
केंद्र, स्पोर्ट्स क्लब इत्यादींनी विविध स्पर्धेचे आयोजन व विजेत्यांना पुरस्कार
वितरण, शाळेतील राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर क्रीडापटूंचे गौरव, विद्यार्थ्यांना यशस्वी
खेळाडुंबाबत मार्गदर्शन, समुपदेशन, नामवंत खेळाडुसोबत संवाद साधणे आदी कार्यक्रम
आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व
क्रीडा क्षेत्रातील योगदानावर प्रकाश, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक,
क्रीडा प्रेमी नागरीक यांच्यासोबत करीअर संदर्भात परीसंवाद व चर्चासत्र, आपल्या
संघटना, क्लब, केंद्रातील खेळाडूंना चर्चासत्र व परीसंवाद, स्पर्धा, उत्कृष्ट
खेळाडूंचा गौरव व पुरस्कार देणे याप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करुन हा दिवस
साजरा करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment