महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या ‘गट ब व क’ सेवा संयुक्त पुर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल


बुलढाणा, दि. 1(जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-ब(अराजपत्रित) व गट क सेवा सयुक्त पुर्व परिक्षा रविवार दि. 5 जानेवारी 2025 व रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित होत्या. तथापि दि. 23 डिसेंबर 2024 च्या आयोगाचे पत्रानुसार नियोजित परीक्षांच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र गट ब(अराजपत्रिका) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा सयुक्त पुर्व परीक्षा रविवार दि. 4 मे 2025 रोजी होणार आहे. सुधारित परिक्षांच्या वेळपत्राकाचे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी केले आहे.  000000000


Comments