रस्ता
सुरक्षा संदर्भात जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा, दि. 15(जिमाका): वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षतेच्या दृष्टीने अंत्यत
महत्वाचे असून रस्ते अपघातात जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाण दुचाकी वाहनाचे सर्वाधिक
आहे. प्रामुख्याने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने रस्ता
सुरक्षा संदर्भात व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी
यावेळी केले.
रस्ता सुरक्षा समिती, व पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन
कार्यालयातर्फे हेल्मेट जनजागृती अभियानानिमित्त शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली.
या हेल्मेट रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागनाथ
महाजन, सहायक पोलीस निरिक्षक आशिष रोही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सेल्फी पाईटवर फोटो काढून
हेल्मेट घालूनच प्रवास करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. हेल्मेट रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी
कार्यालय येथून सुरु होऊन जयस्तंभ चौक, धाड नाका, सर्कुलर रोड, भोडे चौक, बाजार लाईन
मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये पोलिस
विभाग, नगरपरिषद व परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वाहन वितरक प्रतिनिधी सहभागी
झाले होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नागरिक व कर्मचाऱ्यांना रस्ता
सुरक्षासंदर्भात प्रबोधन केले.
000000
Comments
Post a Comment