राष्ट्रमाता
जिजाऊ जन्मोत्सव; जिजाऊ गाथा महोत्सवाचे थाटात
उद्घाटन
बुलडाणा(सिंदखेड राजा), (जिमाका) दि. 10 : राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त
जिजाऊ गाथा महोत्सवाचे आयोजन श्री. लखुजीराजे जाधव राजवाडा(राजमाता जिजाऊ जन्मस्थळ)
येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय,
व नगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मनोज कायदे, माजी आमदार तोताराम कायंदे,
अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय
अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी
मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, मुख्याधिकारी
प्रशांत व्हटकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, माजी नगराध्यक्ष
श्री. ठाकरे, माजी सभापती शिवाजी राजे जाधव माजी नगराध्यक्ष विष्णू भाऊ मेहत्रे आदी
उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक
कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व 100 कलाकारांचा समूहाव्दारे
‘जिजाऊ वंदना महाराष्ट्राची लोकधारा’ या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
करण्यात आले. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या
या सोहळ्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक संचालक संदीप
शेंडे यांनी केले.
000000
Comments
Post a Comment