राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागामार्फत राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 या वर्षाकरीता नामांकने मागविण्यात आले आहे. अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी आपले नामांकन अर्ज, प्रस्ताव दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

 

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात.

 

सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था याना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख ५० हजार रुपये संस्थेस 1 लाख रुपये तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

 

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा, संचालनालयाचे आयुक्त यांनी केले आहे.  

00000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या