राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाण यांची त्रैमासिक आढावा सभा सपंन्न

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाण यांची

त्रैमासिक आढावा सभा सपंन्न

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि. 15 जानेवारी  रोजी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांची त्रैमासिक आढावा सभा पार पडली. या आढावा सभेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक  प्रतिनिधी डॉ विश्वास खर्चे , पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरक्षिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रा.शिक्षण अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, दंतशल्यचिकित्सक, कृषी अधिकारी व राष्ट्रीय तंबाखू नियत्रण कार्यक्रमाच्या अर्चना आराख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सर्व शाखा व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात यावेत. पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग व आरोग्य विभाग यांनी संयुक्त रित्या कोटपा (2003) ची कार्यवाही महिनाच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक पार पडली. 000000000

Comments