जवाहर नवोदय विद्यालय; 18 जानेवारीला निवड
चाचणी परीक्षा
·
परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती
बुलढाणा,
दि. 14(जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या 2025 च्या शैक्षणिक प्रवेशासाठी
निवड चाचणी परीक्षा दि. 18 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 40 परीक्षा केन्द्रावर
होणार आहे. या परिक्षेत जिल्ह्यातून 12 हजार 073 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यातील केद्रांवरील परीक्षा सुरळीत, निपक्षपणे पार पाडण्यासाठी तसेच हुशार
व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे यासाठी परिक्षा दरम्यान कोणताही
अनुचीत प्रकार होणार नाही, यांची दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन
विशेष भरारी पथक व बैठे पथकांची नियुक्ती केली जाणार असुन सदर पथके विविध केंद्रावर
भेटी देणार आहेत. परीक्षा केंन्द्रावर विद्यार्थी किंवा इतर कोणाकडुनही गैरप्रकार करतांना
आढळल्यास संबधितांवर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल, यांची नोंद संबंधीताने
घ्यावी. निवड चाचणी परिक्षा शांततेत व सुरळीतपणे
पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी
केले.
00000
Comments
Post a Comment