राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.13:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट
दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट
छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर
लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1
जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024
पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या
प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.
राज्यातील विविध भागातील
स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील
इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा
राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित
नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचेनमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
अ.क्र |
पुरस्काराचे नाव |
पारितोषिक |
1. |
अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार
(राष्ट्रस्तरीय) |
1,00,000/- (रुपये
एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक) |
2. |
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
3. |
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
4. |
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
5. |
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
6. |
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व
जनसंपर्क) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
7. |
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
8. |
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
9. |
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व
जनसंपर्क) (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
10. |
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
11. |
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
12. |
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
विभागीय पुरस्कार |
||
13. |
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) |
14. |
अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
15. |
आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
16. |
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
17. |
शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
18. |
ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
19. |
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
20. |
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग) |
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) |
0000000
Comments
Post a Comment