6 जानेवारीला लोकशाही दिन

 

6 जानेवारीला लोकशाही दिन

बुलडाणा, (जिमाका) दि. 3:  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जानेवारी  महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी कळविले आहे.  00000000

Comments