महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत विविध पदासाठी पदभरती

 

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत विविध पदासाठी पदभरती

 

            बुलडाणा, (जिमाका) दि. 22: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) पुणे यांच्यामार्फत विविध पदासाठी पदभरती करण्यात येणार आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी दि. 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

 महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) पुणे यांच्यामार्फत दि. 12 जानेवारी रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये महासैनिक औद्योगिक वसाहत भोसरी येथे प्रकल्प व्यवस्थापक(एक पद), क्षेत्रीय व्यवस्थापक नागपूर (एक पद), व्यस्थापकीय मेस्को मुख्यालय पुणे (एक पद), व्यस्थापक लेखा मेस्को मुख्यालय पुणे(एक पद) आहे. यासर्व पदासाठी उमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा. तसेच वयाबाबतचा निर्णय व्यवस्थापकीय मंडळाचा असेल. जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये काही बदल झालेला नसून अर्ज करावायाचा नमुना मेस्कोच्या वेबसाईट www.mescoltd.co.in वर उपलब्ध आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या