प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वाढीव 13 लक्ष 66 हजार 767 घरकुले मंजूर होणार आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ड यादीनुसार घरकुलाची लक्षांक प्राप्त होणार आहे. प्राप्त लक्षांकानुसार आवास लस ड प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतीत सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात व प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले आहे.

 ग्रामपंचायत स्तरावर लाभर्थ्याकडून बँक पासबुक प्रत, आधार कार्ड, नमुना नंबर आठ, जॉब कार्ड, इ कागदपत्रे ग्रामपंचायत  अधिकारी, रोजगार सेवाक व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्यामार्फत जमा करणे सुरु आहे. अद्यापर्यंत जिल्ह्यामध्ये आवास सॉफ्ट वरील कायस्वरुपी प्रतिक्षायादीतील शिल्लक 1 लक्ष 18 हजार 723 लाभार्थ्यांपैकी प्राप्त होणाऱ्या लक्षांक 41 हजार 315 (अंदाजे) पैकी 25 हजार 990 म्हणजे 62.91 टक्के लाभार्थ्यांचे आवास सॉफ्टवर नोंदणीची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. अजूनही उर्वरीत 17 हजार 308 लाभार्थ्यांनी नोंदणी  करणे बाकी आहे. या लाभार्थ्यांनी नमूद कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतींना सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रे जमा करुन केवळ लाभार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शासनामार्फत जिल्हा लक्षांक प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात येणार आहे.

00000000

 


Comments