जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर


बुलडाणा, (जिमाका) दि. 1:  सन 2024-25 च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 51 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 420 गावे आहेत. यातील 1 हजार 58 गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर 362 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

50 पैसेपेक्षा कमी अंतिम पैसेवारी : देऊळगाव राजा येथे 64, मेहकर येथे 161, लोणार येथे 91, सिंदखेड राजा येथे 114, मलकापूर येथे 73, नांदुरा येथे 112, खामगाव येथे 146, शेगांव येथे 73, जळगांव जामोद येथे 119 व संग्रामपूर येथे 105 असे एकूण 1 हजार 58 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे.

50 पैसेपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी : बुलढाणा तालुक्यात 98, चिखली येथे 144, मोताळा येथे 120 असे एकूण 362 गावे गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

0000000

Comments