राज्य
क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमान ऑलम्पिक वीर कुस्तीगीर
स्व.खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त दुसरा राज्य क्रीडा दिन दि. 15 जानेवारी रोजी
भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बुलढाणा येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये
सहभागी आणि प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांचे शुभहस्ते गुलाब पुष्प मोमेंटो
प्रदान करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा
फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ठाकरे, प्रमुख अतिथी प्राचार्य इंगळे मॅडम, भारत विद्यालय
चे वरिष्ठ शिक्षक संजय देवल शिवशंकर विद्यालय
भरोसा तालुका चिखली येथील शारीरिक शिक्षण शिक्षक तथा चिखलीचे क्रीडा स्पर्धा संयोजक
लांडकर सर, तालुका क्रीडा अधिकारी मेहकर मिलिंद काटोलकर, इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते दिप
प्रज्वलित करून ऑलिंपिक वीर कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन तथा
हारार्पण करण्यात आले. तद्नंतर यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.
महानकर यांनी उपस्थित मान्यवरांची खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील माहिती पुस्तक, गुलाब
पुष्प आणि मोमेन्टो प्रदान करुन सन्मानीत केले.
तसेच आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनामध्ये स्व. खाशाबा
जाधव यांचा जीवन परिचय करून दिला. राज्य क्रीडा
दिनाच्या आयोजना मागील शासनाचा नेमका कोणता उद्देश आहे याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना
दिली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित भारत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजय देवल यांनी
सुद्धा खेळाडूंना अमुल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध एकविध खेळ
संघटनेचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्थेतील शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक,
पालक, भारत विद्यालयातील विविध शिक्षक आणि बहुसंख्य राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू
उपस्थित होते. यावेळी पाच आर्चरी, कूडो, या क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय
प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या शुभहस्ते
गौरव करण्यात आला. तसेच योगा, आर्चरी, बॅडमिंटन, फुटबॉल, रोलबॉल, कुराश, बॉक्सींग
,पिंचॅक सिलेट, तेंग सु डो, रायफल शुटींग, ड्रॉप रोबॉल, इत्यादी खेळांमध्ये राज्याचे
प्रतिनिधीत्व केलेल्या जवळपास 46 राष्ट्रीय खेळाडूंचा मान्यवरांच्या शुभहस्ते मोमेंटो
गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित क्रीडा मार्गदर्शक यांचा सुद्धा मान्यवरांच्या
शुभहस्ते मोमेन्टो आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
मनोज श्रीवास यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र धारपवार क्रीडा अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वी करिता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील संदीप केळे, डॉ. जिवन
मोहोड यांनी तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील मानद कर्मचारी विनोद गायकवाड, भीमराव पवार,
कृष्णा नरोटे, सुहास राऊत, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
त्याचप्रमाणे बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे सुद्धा
आज दि.15 जानेवारी 2025 रोजी ऑलम्पिक वीर कुस्तीगीर स्व.खाशाबा जाधव यांचे जयंती दिनाचे
औचित्य साधून, राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे
विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चौथा तालुका जिल्हा बुलढाणा येथे सुद्धा रॅली तसेच
तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे खेळाडूंचा सत्कार व क्रीडाविषयक चर्चासत्राचे आयोजन
करण्यात आले होते. शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे सुद्धा आज दि. 15 जानेवारी 2025 रोजी
राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी
बि. एस. महानकर यांनी कळविले आहे. 00000000
Comments
Post a Comment