ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा ! जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन
ई-महसूल
प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !
जिल्हाधिकारी
डॉ.किरण पाटील यांचे आवाहन
बुलढाणा, दि. 15(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय,बुलढाणा मार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना
ई महसूल प्रणाली अंतर्गत ऑनलाईन सेवांच्या विविध ई प्रणालीचे एकत्रित क्यूआर कोड
(QR code) उपलब्ध केले आहेत. हे क्यूआर कोड शेतकरी, नागरिकांनी मोबाइल फोनद्वारे स्कॅन
करून लिंकवर क्लिक करावे आणि ई महसूल प्रणालीअंतर्गत सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
या ई-महसूल प्रणालीमधील ई हक्क, ई चावडी नागरिक पोर्टल,
ई रेकॉर्डस, ई नकाशा, भुलेख, ई फेरफार या ॲानलाईन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात
आल्या आहेत. ई हक्क प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरील ईकरार नोंद, बोजा कमी करणे, बोजा नोंद
घेणे,गहाणखत, मयत कुळ वारस, नाव कमी करणे,7/12 दुरुस्तीची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज
करता येतो. ई चावडी पोर्टलद्वारे जमीन महसूल कर पावती पाहता येते. ई रेकॉर्ड्स प्रणालीद्वारे
जुना सातबारा, फेरफार, पेरेपत्रक पाहता येतात. ई नकाशा प्रणालीद्वारे शेत जमिनीचा नकाशा
पाहता येतो. भुलेख प्रणालीद्वारे ॲानलाईन सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८ अ उतारा
पाहता येतो. आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्डच्या क्यूआर कोडद्वारे फेरफार नोटीस, मोजणी
नोटीस पाहता येते. याशिवाय डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८अ
उतारा डाऊनलोडसुद्धा करता येणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे सर्व शासन निर्णय पाहता
येतील.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांसाठी या डिजिटल ई महसूल
प्रणाली सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,सर्व
तहसीलदार कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या
ई-प्रणाली सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण
पाटील यांनी केले आहे. ०००
Comments
Post a Comment