प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतंर्गत ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’; शेतकरी बांधवानी योजनाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतंर्गत ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’;
शेतकरी बांधवानी योजनाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा, दि. 8(जिमाका) : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत मागेल
त्याला सौर कृषि पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकरी बांधवानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
योजनेची
वैशिष्टे : शेतकऱ्यांना
सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना, सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ
१० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच, अनुसूचित जाती - जमातींच्या
शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के, उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून
अनुदान. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप, पाच वर्षांची दुरुस्ती हमी,
इन्शुरन्स सह वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होईल.
लाभार्थी निवडीचे
निकष : २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे
सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि
५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.
तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय
राहील. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी
नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या
शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री
महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून
पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. तसेच अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल
सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी
शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
000000
Comments
Post a Comment