राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त विशेष मोहिम; सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त विशेष मोहिम; सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 22: भारतीय डाक विभागामार्फत दि. 24 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय बालिका दिवस दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ, वंचित व बँकिंग सेवा नसलेल्या भागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुकन्या समृद्धी योजना विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत सर्व नागरिकांनी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधून आपल्या 10 वर्षांच्या आतील मुलींचे सुकन्या समृध्दी खाते काढून मुलींचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

000000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या