शिक्षण विभागाच्यावतीने आज शैक्षणिक गुणवत्ता संमेलन ! > विद्यार्थ्यांना ‘सुगम पाठशाला’ साहित्याचे होणार वितरण
शिक्षण
विभागाच्यावतीने आज शैक्षणिक गुणवत्ता संमेलन !
>
विद्यार्थ्यांना ‘सुगम पाठशाला’ साहित्याचे होणार वितरण
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शाळेचा, विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोणातून बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक
गुणवत्ता संमेलन 17 जानेवारी रोजी सहकार विद्या मंदीर, बुलढाणा येथील सभागृहात होणार
आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे प्रमुख
मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
व प्रशिक्षण संस्था बुलडाणाचे प्राचार्य डॉ.जे.ओ.भटकर, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
बी.एम.मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश
राठोड हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,
केंद्र प्रमुख व शाळेतील शिक्षक उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनात विद्यार्थांच्या
सर्वांगीण ज्ञानात वाढ व्हावी व संगीत क्षेत्राचे शिक्षण मिळावे. यासाठी जिल्ह्यात
सुगम पाठशाला अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी संगीत साहित्याचे वितरण मुख्य
कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा
परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ) बि.आर.खरात व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment