जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

        बुलढाणा, दि. 6(जिमाका) : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आज जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          आचार्य जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे नियतकालीक सुरू केले. त्यानिमित्ताने दर्पण दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी माहिती सहायक सतिश बगमारे, वरिष्ठ लिपीक प्रतिक फुलाडी, जयंत वानखडे, श्रेया दाभाडकर, लिपीक सौरभ बढिये, प्रमोद राठोड, नामदेव घट्टे, राम पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 00000


Comments