कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा; सहसंचालकांची कुष्ठ कार्यालयास भेट

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठ) बुलढाणा कार्यालयास आज आरोग्य सेवा(कुष्ठ व क्षय, पुणे) सहसंचालक राजरत्न वाघमारे तसेच आरोग्य सेवा (राष्ट्रीय आरोग्य अभियान) मुंबई सहसंचालक डॉ. बी. एस. सोनावणे यांनी भेट दिली.

भेटीदरम्यान कुष्ठरोग कार्यालयाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्री. वाघमारे यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. कार्यालयातील दैनंदिन कामकाज, नव्या कुष्ठरुग्णांची नोंदणी, रुग्णांना MDT औषधोपचार पुरवठा तसेच DPMR नोंदींची पडताळणी करण्यात आली. तसेच, शासनातर्फे राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC), कुसुम व स्पर्श अभियानांतील कामाचा आढावा घेण्यात आला. या मोहिमांदरम्यान कार्यालयाकडून वर्तमानपत्रे व सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.

सहसंचालकांनी नव्या रुग्णांच्या शोधाबरोबरच रुग्णांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार (PEP) देण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, डॉ. खिरोडकर (वैद्यकीय अधिकारी), तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठ) कार्यालयातील डॉ. किसन राठोड (वैद्यकीय अधिकारी – DNT), डॉ. ई. बी. शिंदे (अवैद्यकीय पर्यवेक्षक), राजेंद्र धुड, किसन डुकरे, प्रदीप ढोण, रवींद्र बढे (अवैद्यकीय सहाय्यक), अभिजित कुलकर्णी (सांख्यिकी सहाय्यक), गोकुळ गवळी (वरिष्ठ लिपिक) व मनोज वार्डेकर (कनिष्ठ लिपिक) उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या