HPV लसीकरणाबाबत खामगाव येथे जनजागृती कार्यक्रम

 

HPV लसीकरणाबाबत खामगाव येथे जनजागृती कार्यक्रम

 

बुलढाणा, दि. 15 (जिमाका): खामगाव येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांसाठी HPV लसीकरणाविषयी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंडारे व डॉ. शीतल ठक यांनी HPV लसीकरणाचे महत्त्व, त्याचे फायदे तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. लसीकरणामुळे भविष्यातील आरोग्य सुरक्षिततेसाठी कशी मदत होते, हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये HPV लसीकरणाबाबत जागरूकता वाढून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास मुख्याध्यापक खराटे सर, अरविंद शिंगाडे, खरात सर, पालक प्रतिनिधी संजय बांगर, विनोद लाहूडकर, परिचारिका नाजुका गवई, आशा वानखडे तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी