मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी 4 मेपर्यंत नामांकने मागविली

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने सन २०२६ करिता प्रतिष्ठित मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ४ मे २०२६ पर्यंत संबंधित जिल्हा खादी मंडळ कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी यांनी केले आहे.

मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे तसेच यशस्वी मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या पुरस्कारांतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये एक पुरस्कार विशेषतः महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुरस्काराची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ५ हजार  रुपये  अशी आहे. दि. २० मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक मधमाशी दिन निमित्त पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mskvib.org) उपलब्ध असलेला अर्ज भरून दि. ४ मे २०२६ पूर्वी संबंधित जिल्हा खादी मंडळ कार्यालयात सादर करावा. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातही नामांकन अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, बुलढाणा (दूरध्वनी: ०७२६२-२९९०७६) किंवा मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी: ०२१६८-२६०२६४) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी